डिकसळचा सरपंच चंद्रकांत करांडे लयच' भारी,त्यांची सेवा घरोघरी
त्या सरपंचाचा गावच्या विकासकामावर जोर.....सरपंच असावा तर असा
डिकसळ हे गाव सोलापूर-सांगली सरहद्दीवरील व सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे ,अगदी माळरानावर वसलेले ,अवघ्या २५०० लोकवस्तीचे गावं, पण येथील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम २०२०-२०२१ या निवडणूकी मध्ये मा. आ.दिपक आबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,
डिकसळ ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली ,अन तेव्हापासूनच विकास कामांना जोर लावला.
गेली पिढ्यानपिढ्या येथील स्मशानभूमी नसलेलं एकच गावं येथील स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांची होणारी गैरसोय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्याने हा विषय मात्र संपुष्टात आला आहे, याचे श्रेय जाते ते येथील कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय नवनियुक्त सरपंच मा.चंद्रकांत (बापू) करांडे,आणि त्याचबरोबर मा.श्री. अशोक करताडे राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष, मा.श्री.मधुकर करताडे,मा.श्री.मुरलीधर करांडे, मा.श्री.दत्तात्रय करांडे, मा.श्री.सुनील बाबर,मा.श्री.समाधान गायकवाड, मा.श्री विकास गंगणे , भाऊसाहेब गेजगे यांना ,विद्यमान सरपंच हे गावातील तरूणांचे ताईतच आहेत, सरपंच चंद्रकांत करांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेशाध्य मा.दिपक आबा साळुंखे पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कार्यकर्ते आहेत.
५० वर्षे गावामध्ये एवढा निधी केव्हाच आला नाही आणि गेली १३महिन्यापासून विकास कामाचा जणू सपाटा लावला आहे या निधीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन चे सभापती मा.अनिल मोटे यांचा सिंहाचा वाटा आहे , विकास म्हणजे काय असतो हे या उपलब्ध निधीवरून लक्षात येईल.
यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती मा. अनिल मोटे यांच्या प्रयत्नातून विविध शेती अवजारे व साहित्य वाटप अणि त्याचबरोबर स्मशानभूमी शेड बांधणे , बाजार पटांगण पेव्हिंग ब्लॉक बसवणे , गाव अंतर्गत रस्ते करणे ,वाडीवस्तीवरती लाईट ,
इतापे वस्ती सभामंडप बांधणे ,जि. प.शाळा दुरुस्ती करणे ,गावठाण दलित वस्ती अंतर्गत बंदिस्त गटार गंगणे वस्ती काँक्रिट रास्ता करणे , गावठाण दलीतवस्ती पेव्हिंग ब्लॉक रस्ता ,ओढा खोलीकरण ,रुंदीकरण व दुरुस्ती ,जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे सर्व्हेक्षण करणे ६० लक्ष आणि १५ वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर विविध विकास कामे १६ लक्ष रुपये .
अशा प्रकारच्या विविध विकास कामे झाल्याने ,गावच्या जनतेच्या मनातील ऐकमेव सरपंच म्हणजे चंद्रकांत भिमराव करांडे .तसेच या सरपंचानी गावात पक्ष पात न करता ,गावातील तंटा मिटवून,गोररगरीबांच्या मदतीला धावणे,गोरगरीबांना अन्न धान्य करणे,तसेच गावातील प्रत्येक युवकांचा बड्डे थाटामाटात पदरच्या स्वखर्चाने केल्याने या गावातील सर्व युवक, ग्रामस्थ ,सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्यामधून आनंद व्यक्त केला आहे.


0 Comments