‘या’ कारणामुळे, मामानेच केली २५ वर्षीय भाच्याची हत्या!
पुणे : पुण्याचा खेड तालुक्यातील सेझ प्रकल्प क्षेत्रात जमिनीच्या वाटणीवरून पैशांची मागणी करून त्रास देणाऱ्या बहिणीच्या २५ वर्षीय मुलाची मामानेच डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे. अजय भालेराव असे मयत तरुणाचे नाव आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि, खेड तालुक्यातील सेझमध्ये संपादित झालेल्या रेटवडी येथील जमिनीच्या मोबादल्यावरून खेडमधील कुटुंबाचा वाद सुरू होता.
मोबादल्याचा वाटा आईला मिळावा यासाठी अजय भालेराव आणि त्यांचा मामा शांताराम शिंदे, मामेभाऊ सुनील शिंदे यांच्यात वाद सुरू होता. जमिनीवरील पैशाचा वाद वाढत गेला. या वादात खेड सेझ परिसरातील कमानीजवळ मामेभाऊ व मामाने भाचा अजय भालेराव यांच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.दरम्यान, हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हत्या करणाऱ्या मामा आणि त्यांचा मुलाचा शोध घेत आहे.


0 Comments