google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजणार.. जि. प., पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Breaking News

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजणार.. जि. प., पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजणार.. जि. प., पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 

यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समितीचे गट होते त्यामध्ये बदल करून आता , जिल्हा परिषदेचे 8 गट , पंचायत समितीचे 16 गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रशासनाने तयार केली आहे.

सांगोला : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेखाली सांगोला महसूल प्रशासनातर्फे जाहीर केली. यामध्ये 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गण तयार करण्यात आले आहेत. वाढेगाव जिल्हा परिषद गट व त्यामध्ये धायटी व वाढेगाव पंचायत समिती गण वाढले आहेत.


जवळा जिल्हा परिषद गट ऐवजी वाढेगाव जिल्हा परिषद गट नव्याने वाढविण्यात आला असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे. यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समितीचे गट होते त्यामध्ये बदल करून आता , जिल्हा परिषदेचे 8 गट , पंचायत समितीचे 16 गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रशासनाने तयार केली आहे.


तालुक्यात वाढत्या लोकसंख्ये प्रमाणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जिल्हा परिषद गट व 2 पंचायत समितीचे गण वाढवण्यात आले आहेत. यामध्ये जवळा जिल्हा परिषद गटा ऐवजी वाढेगाव जिल्हा परिषद गट तसेच जवळा जिल्हा परिषद गट ऐवजी आता कडलास जिल्हा परिषद गटाची गट रचना बदलली आहे. जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 7 ऐवजी 8 तर पंचायत समिती सदस्य 14 ऐवजी आता 16 अशी झाली आहे. नवीन गट व गणांमध्ये कोणत्या गावांचा समावेश झाला?


जुन्या गट – गणातील कोणती गाव वगळली ? कोणती गावं नव्याने जोडण्यात आली? याबाबत ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. यावर अनेकदा सोशल मीडिया वरून चर्चा रंगल्या होत्या. या रचनेमुळे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.


नेत्यांच्या भेटीगाठी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. निवडणुकीपूर्वीच दंड थोपटल्याचे दिसून आले होते. या प्रभाग रचनेवर 2 ते 6 जून पर्यंत सुचना , हरकती मागणविण्यात आल्या आहेत. तसेच 14 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments