उपाध्यक्षांना पाठवलेल्या एकनाथ शिंदेंच्या पत्रावर 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या ! वाचा त्या आमदारांची संपूर्ण यादी
त्यामुळे मुंबईत आता मातोश्रीवरील घडामोडींकडे सगळ्यांची नजर लागली आहे. शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं आहे. 23 जून रोजी पाठवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या या पत्रावर सही करणारे 37 आमदार कोण आहेत, त्यावर एक नजर टाकुयात..
एकनाथ शिंदे
भरत गोगावले
विश्वनाथ भोईर
महेंद्र थोरवे
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा
लता सोनवणे
संजय शिरसाट
ज्ञानराज चौगुले
यामिनी जाधव
शहाजी पाटील
तानाजी सावंत
शंभूराज देसाई
महेश शिंदे
प्रकाश सुर्वे
संजय रायमुलकर
महेंद्र दळवी
संदीपान भुमरे
रमेश बोरनारे
बालाजी प्र किणीकर
अब्दुल सत्तार
प्रदीप जैस्वाल
संजय गायकवाड
चिमणराव पाटील
अनिल बाबर
सुहास कांदे
प्रताप सरनाईक
बालाजी कल्याणकर
किशोर पाटील
योगेश कदम
दीपक केसरकर
मंगेश कुडाळकर
गुलाबराव पाटील
सदा सरवणकर
प्रकाश आविटकर
दादा भुसे
संजय राठोड
महाराष्ट्रातील सत्तेचं गणित आता कसं असेल?
एकनाथ शिंदे गटाला महाविकास आघाडीत राहायचं नाही. त्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे जोपर्यंत मविआतून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही मुंबईत येणार नाही, असंही ते म्हणालेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा वेळी आता नेमकी राजकीय समीकरणं काय तयार होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडून 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. निलंबन करण्यात यावं, या मागणीसाठी करण्यात आलेल्या 12 आमदारांमध्ये नेमक्या कुणाकुणाची नावं आहेत, त्यावरही एक नजर टाकुयात…
एकनाथ शिंदे (कोपरी)
तानाजी सावंत (भूम-परंडा)
संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)
संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
अब्दुल सत्तार (सिल्लोड)
भरत गोगावले (महाड)
प्रकाश सुर्वे (मागाठाणे)
अनिल बाबर (सांगली)
बालाजी किनीकर (अंबरनाथ)
यामिनी जाधव (भायखळा)
लता सोनावणे (चोपडा)
महेश शिंदे (कोरेगाव)
एकनाथ शिंदेंसोबतच समर्थक आमदार शिवसेनेच्या पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्या कारणामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यातही आलं आहे.


0 Comments