Breaking News

सोलापूरात 35 वर्षीय युवकाने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

 सोलापूरात 35 वर्षीय युवकाने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

सोलापूर : शहरातील मुरारजी पेठेत  राहणाऱ्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रितेश राजेंद्र परदेशी वय 35  वर्ष असे त्या मयत युवकाचे नाव आहे. मुरारजी पेठेत कल्पना चित्रपट गृहाच्या पाठीमागे तो राहत होता.


रविवारी सायकाळी ५ः३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली असून या आत्महत्येपाठीमागचे नेमके कारण काय? हे अजूनही स्पष्ट झाले नाही. फौजदार चावङी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  


संबंधित युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हाॕस्पिटलला पाठवण्यात आला असून या घटनेचा तपास फौजदार चावडी पोलिसांकडून  केला जात आहे असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments