सोलापुरात चर्चा पोलिसांच्या जम्बो बदल्यांची ; पहा नावाची यादी कुणाची कुठे झाली बदली
सोलापूर – पोलिस आयुक्तालयातील ३१८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयुक्त हरिश बैजल यांनी मंगळवारी दिले विविध पोलिस ठाण्यांमधील तसेच शाखांमधील सुमारे ५० कर्मचाऱ्यांना मुख्यालयात पाठविण्यात आले. शहर गुन्हे शाखेतील २२ कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करण्यात आली असून त्यापैकी ११ जणांना पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. तसेच विविध कारणांनी पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आलेल्या ४७ कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयातच ठेवण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त हरिश बैजल हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे चालू वर्षी आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर पोलिस आयुक्तांनी बदल्याचे आदेश दिले.
आयुक्तालयात एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण केलेल्या सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई या पदाच्या ३१८ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. फौजदार चावडी पोलिस ठाणे, जेलरोड पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे, सलगर वस्ती पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, शहर वाहतूक शाखा, दहशतवाद विरोधी कक्ष, नियंत्रण कक्ष, दंगा नियंत्रण पथक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला सुरक्षा विभाग, नागरी सुविधा केंद्र, मोटार परिवहन विभाग, जलद प्रतिसाद पथक आदी विभागांमधील कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.


0 Comments