दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती; वाहतूक पोलिसांचे परिपत्रक जाहीर
मुंबई: मुंबईत आता दुचाकीवरून प्रवास करताना मागे बसणाऱ्या पिलियन रायडरलाही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात येणार आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्हीही व्यक्तींनी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येणाऱ्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी लागू केलेल्या परिपत्रकातून जाहीर केले आहे. हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नव्या नियमावलीत करण्यात आली आहे.
रोड अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोटर वाहन अॅक्ट १९९८ मध्ये मोठे बदल केले आहेत. या कायद्यात हेल्मेटचा नियम लागू करण्यात आला आहे. भारतात दोन चाकी वाहनांच्या अपघाताची संख्या वाढली आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. देशात अपघाताच्या बाबतीत नागरिक अजुनही गंभीर झालेले नाहीत. हेल्मेट सोबत ठेवतात पण त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे आता यावर नवे नियम जारी केले आहेत.
नव्या नियमानुसार जर वाहन चालकाने हेल्मेट घातले असेल पण त्या हेल्मेटची पट्टी खुल्ली असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावालागू शकतो. जर तुम्ही आयएसआय मानांकनाचे हल्मेट घातले नसेल तर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावे लागणार. आता अशा पध्दतीने वाहनचालक सापडले तर त्या वाहन चालका विरोधात कलम १२९ नुसार सरकार कारवाई करु शकते. वाहन चालकाने हेल्मेट घातले असेल पण ते योग्य पध्दतीने घातले नाहीतर त्याच्याकडून २ हजारांचा दंड वसुल केला जावू शकतो. जास्त वजनाच्या गाड्यांविरोधातही सरकारने नवे नियम लागू केले आहेत. नियमापेक्षा जास्त वजन गाड्यांमध्ये असेल तर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
तसेच, तुम्ही वाहन चालवताना जर तुमच्या सोबत लहान मुलगा असेलतर त्या मुलाच्या डोक्यावरही हेल्मेट असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासोबत हार्नेट बेल्टचा वापर करणे अनिवार्य आहे. हा बेल्ट चालकासोबत बांधुन ठेवावा लागणार आहे. कारण वाहन चालवताना लहान मुलगा यामुळे खाली पडू शकणार नाही.


0 Comments