google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोफत गॅस कनेक्शन हवं आहे का ? मग ' या ' सरकारी योजनेसाठी आजच करा अर्ज , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Breaking News

मोफत गॅस कनेक्शन हवं आहे का ? मग ' या ' सरकारी योजनेसाठी आजच करा अर्ज , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 मोफत गॅस कनेक्शन हवं आहे का ? मग ' या ' सरकारी योजनेसाठी आजच करा अर्ज , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. यासोबतच महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल, हाही सरकारचा प्रयत्न असतो.

देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. सरकार सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुरवते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असते आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता


दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या लोकांकडे बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.

तुम्ही जर वनवासी किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.

घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक


आधार कार्ड 

पासपोर्ट साइज फोटो

मोबाईल नंबर 

बँक पासबुकची प्रत 

रेशन कार्ड

BPL कार्ड 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?


तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही याच्या अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com ला भेट देऊ शकता. येथून एक फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा. यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Post a Comment

0 Comments