राज ठाकरेंच्या अल्टीमेटमला महाराष्ट्र पोलीस देणार चोख प्रत्युत्तर.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मिटींग घेऊन दिले कडक कारवाई करण्याचे आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून लाउडस्पीकर काढण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली.या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
आज झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे गृहमंत्र्यांनी दिले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत. तेढ निर्माण करताना एखादी व्यक्ती, गट आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील संवेदनशील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे


0 Comments