महिलेचा हत्या करून मृतदेहावर वारंवार बलात्कार; नराधमाला अटक!
तेलंगणा: मानवतेला काळीमा फासणारी एक अमानुष घटना तेलगंणा राज्यातील हैदराबादपासून ५० किलोमीटरवर असलेल्या चौतुप्पल शहरात घडल्याचे समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. एका २५ वर्षीय नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला. त्यानंतरही तो शांत बसला नाही. पीडित महिलेच्या मृतदेहावरही त्याने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार केला. तसेच, महिलेची हत्या करून तिचे सोन्याचे दागिने घेऊन हा नराधम पसार झाला होता. बांधकाम सुपरवायझर असलेल्या या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, ही निर्दयी घटना चौतुप्पल शहरात ९ मे रोजी घडली. आरोपी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. तर २४ वर्षीय पीडिता आपल्या पतीसोबत एका गोडाऊनमध्ये राहत होती. तिचा पती एका महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. त्यामुळे पीडिता घरी एकटीच असायची. हीच संधी साधून आरोपीने गोडाऊनमध्ये घुसून पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर आपण केलेले कृत्य समोर येईल, या भीतीने एका तासाच्या अंतराने त्याने पीडितेची हत्या केली. त्यानंतरही तो शांत थांबला नाही, त्याने पीडितेच्या शरीराचेही लचके तोडले.
दरम्यान, चौतुप्पल शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त उदय रेड्डी यांनी सांगितल्यानुसार, आरोपीने महिलेच्या डोक्यावर बोथट वस्तूने वार करून तिची हत्या केली असावी. आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर सतत बलात्कार केला. आणि पीडितेचे सोन्याचे दागिने चोरून घटनास्थळावरून पसारा झाला. पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments