लहान मुलांवर टोमॅटो फ्लूचे संकट; पालकांनो… ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
मुंबई : कोरोनामुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली असताना आता देशावर नवं संकट घोंगावत आहे. देशात टोमॅटो फ्लूच्या प्रकरणात वाढ होत असल्याने लहान मुलांवरील धोका वाढला आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका सर्वात जास्त आहे. केरळमध्ये ‘टोमॅटो फ्लू’च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लगाल्याने तामिळनाडू सरकारने खबरदाराचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू सरकारने राज्याच्या सीमेवर आरोग्यविषयक देखरेख वाढवली आहे. टोमॅटो फ्लू हा भारतातील एक सामान्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ताप येतो, सहसा पुरळ उठणे, त्वचेची जळजळ होते. या फ्लूमुळे संक्रमित मुलांच्या शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणून याला “टोमॅटो फ्लू” किंवा “टोमॅटो फीवर” म्हणतात. ही आहेत लक्षणे :- उच्च ताप, पुरळ उठणे, त्वचेची जळजळ, आणि हात आणि पाय त्वचेचा रंग बदलतो. फोड येतात. ओटीपोटात पेटके, मळमळ, उलट्या किंवा अतिसार, खोकला, सर्दी थकवा आणि शरीर दुखणे यांसारखी लक्षणं आढळून येतात. महत्वाची गोष्ट घ्या लक्षात :- आरोग्य अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू प्राणघातक नाही, त्यामुळे आपल्या पाल्याला असे कही झाल्यास अजिबात घाबरून न जाता डॉक्टरकडे घेऊन जाऊ. यावर सहजतेने उपचार केले जाऊ शकतात आणि रिकव्हरी पण लगेचच होते.
0 Comments