ब्रेकिंग : …अखेर आटपाडी ग्रामपंचायतीची झाली नगरपंचायत : शासनाचे परिपत्रक जाहीर
आटपाडी: आटपाडी येथे लवकर नगरपंचायत अस्तित्वात येईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडी येथील शेतकरी मेळाव्यात जाहीर केली होती. त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले असून याबाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे.
आटपाडी येथील शेतकरी मेळाव्यात आ.अनिल बाबर यांनी तालुक्यातील बहुसंख्य गावात कृष्णेचे पाणी आले आहे. आटपाडी तालुका विकासाबाबत प्रगती पथावर आहे. परंतु, शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषदेची आवश्यकता आहे,
मात्र तांत्रिक अडचणीमुळे तात्काळ नगरपंचायत व्हावी आणि त्याची त्वरित घोषणा करावी अशी मागणी केली. त्यावेळीमंत्री शिंदे यांनी लवकरच नगरपंचायत अस्तित्वात येईल आणि शहराच्या विकासाला निधी पडू देणार नाही शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे रोल मॉडेल करू अशी ग्वाही दिली.


0 Comments