खळबळजनक : सुसाईड नोट लिहून पोलीस कर्मचाऱ्यांने केली गळफास लावून आत्महत्या
जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी संजय सोळंके यांनी दक्षता नगर पोलीस वसाहत येथील लिंबाच्या झाडाला सकाळी 7 वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृतदेहा सोबत सुसाईड नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार खदान पोलिस स्टेशन असतील दक्षता नगर पोलीस वसाहतीमध्ये सकाळी 7 वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी संजय सोळंके वय 47 वर्ष बक्कल नंबर 822 हा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत खदान पोलिसांनी आढळून आला असता पोलिसांनी
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी संजय सोळंके हा जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होता अशी माहिती प्राप्त होत असून त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत.



0 Comments