वाणिचिंचाळे येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा अन्यथा उपोषण करणार- मा. सरपंच लक्ष्मण निळे
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी "आर्थिक" हितसंबंधाने रस्त्याचे काम केले "निकृष्ट" दर्जाचे
सांगोला प्रतिनिधी, वाणीचिंचाळे येथील निळेवस्ती येथे सध्यस्थितीला रस्त्याचे काम 30/54/50/54 हेड खाली मंजूर होऊन ते पुर्ण झालेले आहे. तरी काम करत असताना रस्त्याचे खोदकाम न करता खडी टाकलेली आहे. व रोडवरती कामापुरती लाल माती टाकलेली असुन नुसता देखावा करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हे काम करत असताना बांधकाम विभागच्या अधिकाऱ्याकडून ठेकेदाराला वरदहस्त दिला जात असल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे किमान दोनशे लोकांची या कामामुळे जाण्याची गैरसोय झालेले आहे. कारण पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी या ठिकाणी चिखल होत आहे.
या कामाची योग्य ती खातेनिहाय चौकशी व्हावी व सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई हवी अन्यथा वाणीचिंचाळे येथील सर्व ग्रामस्थ आपले कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची मागणी वाणीचिंचाळे येथील माजी सरपंच लक्ष्मण निळे यांनी केली आहे.


0 Comments