google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! ‘School Bus’मध्ये आता ‘ती’ गोष्ट बंधनकारक

Breaking News

मोठी बातमी! ‘School Bus’मध्ये आता ‘ती’ गोष्ट बंधनकारक

 मोठी बातमी! ‘School Bus’मध्ये आता ‘ती’ गोष्ट बंधनकारक

मुंबई :शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न दर काही दिवसांनी समोर येत असतो. त्या त्या काळात त्यावर प्रतिक्रिया येतात नंतर पुढे मात्र काहीच होत नाही. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणे आणि त्यांच्या एकूण प्रवासातील सुरक्षीतता हा प्रश्नही अनेकदा मांडला गेला आहे. याचे तोटेही विद्यार्थ्यांनी व पालकांनी भोगलेले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेबाबत एक मोठा निर्णय अप्पर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) घेतला आहे.


शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलीची सक्ती तातडीने करणे आणि प्रत्येक स्कूलबस मध्ये जीपीआरएस बसवण्यासाठी सूचना अप्पर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एक मोठी घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस तब्बल 4 तास उशिरा पोहोचली. मात्र या 4 तासात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती.


बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप आपापल्या पालकांकडे पोहचले. मात्र त्यानंतर जागे झालेल्या शाळा प्रशासन आणि पालक यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशाच प्रकारच्या घटना इतर काही शहरांमध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं. यासंदर्भात मनविसे यांनी शालेय शिक्षण विभाग आणि पोलिसांना पत्र लिहून याबाबत नियमावली कडक करण्याची मागणी केली होती.


त्यानंतर आता राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत. यानुसार राज्यात प्रत्येक ‘स्कूलबस’मध्ये ‘जीपीआरएस’ बसवणं अनिवार्य असणार आहे.


जूनमध्ये नवं शैक्षणिक वर्ष सुरू होत असून राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या बस सेवांमधील त्रुटी दूर करण्याची गरज असल्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्कूलबसमध्ये जीपीआरएस असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments