आमदार साहेब वाणीचिंचाळे गावातील विकासाकडे कधी लक्ष देणार...?का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त आश्वासनांचे
आमदार साहेब वाणीचिंचाळे गावातील विकासाकडे कधी लक्ष देणार का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त आश्वासनांचे "गाजर" दाखवणार.
वाणीचिंचाळे गावाला तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेत्यांनी वंचीत ठेवले
सांगोला प्रतिनिधी,सांगोला तालुक्यातील वाणीचींचाळे गाव हे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील हद्दीवर असणारे गाव आहे.गावाच्या इतिहासात आजपर्यंत तालुक्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणुकीत गावात येऊन आश्वासनांचे गाजर दाखवण्यापलीकडे काहीही केले नाही.आणी गावातील स्थानिक लोकांनी त्यांना साथ देण्यापलीकडे काही केले नाही.
त्यामुळेच या राजकिय नेत्यांनी त्याचा फायदा घेत आजपर्यंत समस्त वाणीचिंचाळे करांना पाण्यासाठी असणार्या विविध योजना पासून वंचित ठेवले आहे.तालुक्यातील सर्वच आजी-माजी राजकीय नेत्यांनी वाणीचिंचाळे गावाला टेंभू म्हैसाळ योजनेतून वंचित ठेवले आहे. नागरिकांनी फक्त मागणी करा मी तुमची कामे करण्यासाठी आमदार म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करीत आहे.बंदिस्त पाईपलाईनच्या कामामुळे येणाऱ्या वर्षभराच्या काळात हा परिसर हिरवागार होणार आहे.
तसेच अजून वंचीत राहिलेल्या भागातील शेतीला पाणी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच त्याला ही यश येईल व हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असेल असे आमदार शहाजी बापू पाटील सांगतात. पण सांगोला तालुक्यातील पुर्वेकडील भागातील वाणीचिंचाळे गावाचा आजपर्यंत कोणत्याही योजनेत समावेश केला नाही.तसेच राजकीय इच्छाशक्ती देखील दाखवली नाही.आता पर्यंत तालुक्यातील सर्व आजी-माजी आमदारांनी फक्त मतांच्या जोगव्यासाठीच येथील लोकांचा वापर करून घेतला आहे.
निवडनुका आल्या कि प्रत्येक नेत्याला फक्त मतांपुरतीच आठवण येते.नंतर मात्र पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था आहे.मात्र आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने या आमदारांनी केवळ आश्वासन, बैठक याव्यतिरिक्त काही हि केले नाही. बैठका घेऊन फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून मतं मिळवणार्या नेत्यांना आता तरी वाणीचिंचाळे गावातील सुज्ञ नागरिक कृतीतून किंमत दाखवून देणार की पुन्हा तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनून राहणार. राजकिय नेत्यांनी मात्र आतापर्यंतच्या काळात वापरच करून घेतला आहे.
त्याची परतफेड म्हणून आश्वासन आणि बैठकांचे गाजर न दाखवता आणि वरवरचं पुतना-मावशीचे प्रेम न दाखवता आश्वासनांची पूर्तता करून वाणीचिंचाळे गावाचा टेंभू-म्हैशाळ समावेश करुन गावाला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार का हा येणारा काळच ठरवेल. आपल्या गावाचा विकास करण्यासाठीगावातील सुज्ञ नागरिकांनी कृतीतून रस्त्यावर उतरून, आंदोलन करून तालुक्यातील राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याशिवाय न्याय मिळणार नाही यासाठी तयार होणार का पुन्हा एकदा राजकिय नेत्यांची आर्ती करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
0 Comments