google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आणि मोदी स्वतःच म्हणाले; मतदानासाठी जाताना सिलिंडरला नमस्कार करा

Breaking News

आणि मोदी स्वतःच म्हणाले; मतदानासाठी जाताना सिलिंडरला नमस्कार करा

 आणि मोदी स्वतःच म्हणाले; मतदानासाठी जाताना सिलिंडरला नमस्कार करा

मुंबई : सध्या पेट्रोल-डिझेल, एलपीजी, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशातच काही दिवसांपासून घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे दर वाढतच चालले आहेत. विशेष बाब म्हणजे पेट्रोल-डीझेलचे दर 1 रुपयाने वाढले तरी आंदोलने करणारी पार्टी आज सत्तेत आहे, मात्र ते या महागाईवर एक अवाक्षरही बोलत नाहीत. अशातच पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल आहे.


सतत होत असलेल्या दरवाढीमुळे आता सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत आहे. “मतदान करायला जाताना सिलिंडरला नमस्कार करा” असं म्हणतानाचा मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.


नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा हा व्हिडिओ असून यामध्ये मोदी हे तत्कालीन केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. मोदींनी सिलिंडरचे भाव वाढल्यावर तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. “तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल, तेव्हा घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करा” असं नरेंद्र मोदी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचं दिसत आहे.


सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

Post a Comment

0 Comments