सांगोला तालुक्यात यावर्षी पिण्याच्या पाण्याचा टँकर व चारा छावणीची मागणी नाही -तहसीलदार अभिजीत पाटील.
सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून तालुक्याची ओळख होती सांगोला तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता म्हणून पिण्याच्या पाण्याच्या टँकर ची मागणी केली जात होती. त्याप्रमाणे सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पाण्याचे टॅंकर दिले जात होते. ्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होता म्हणून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या .त्यामुळे तालुक्यातील पशुधन वाचले होते शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला होता.
परंतु यावर्षी उन्हाळ्यामध्ये िण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही तसेच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मिटला यामुळे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर व जनावरांसाठी चारा छावणीची मागणी अद्याप पर्यंत नागरिकांनी केली नसल्याची माहिती सांगोल्याचे कर्तव्यदक्ष
तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगोला जमतला दिली. ते पुढे म्हणाले की तालुक्यामध्ये पाणी टंचाई नाही त्याचबरोबर जनावरांचा चारा देखील उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी आमच्या कार्यालयाकडे मागणी केली नाही. शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही वेगवेगळी शिबिरे आयोजित करीत आहोत .
त्यामुळे सामान्य नागरिकांना जागेवरती विविध योजनांचा लाभ मिळत आहे .या शिबिरासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. योजना राबविताना तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावराच्या चाऱ्याचा या प्रश्नासंदर्भात आम्ही माहिती घेतलेली आहे. अशा पद्धतीची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे
तालुक्याची ओळख ही दुष्काळी तालुका म्हणून ओळख होती परंतु यावर्षी तालुक्यांमध्ये पिण्याचा पाण्याचा एकही टॅंकर नसल्यामुळे तसेच तालुक्यामध्ये चारा छावणी नसल्यामुळे तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसला गेल्याची चर्चा सांगोला तालुक्यांमध्ये सुरू आहे. पुढील काळामध्ये देखील तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टॅंकर व जनावरांसाठी चारा छावणी ची गरज भासू नये अशा पद्धतीची माफक अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे
0 Comments