ब्रेकिंग : अखेर मनसे बॅकफूटवर; ‘तो’ महत्वाचा निर्णय रद्द
मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील जाहीर सभा काल झाली. या सभेला मनसेसैनिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेत राज यांनी मागील दोन सभांमधून आघाडी सरकारवर ताशेरे ओढले होते. या सभेतही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्याच वेळी हे ‘मंदिरावरीलही भोंगे उतरवा, पण मशिदींवरील भोगे उतरल्यानंतरच मंदिरावरील भोंगे उतरवा’, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दरम्यान आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर एक महाआरती करण्याचे मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनांचे जे नियोजन होते, ते आता रद्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक शाखेत ही महाआरती होणार होती. मात्र ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी 4 तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा उद्या ऐवजी 4 तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज यांनी ईद मुळे भोंग्याच्या उतरवण्याच्या नियोजनाला एक दिवस वेळ दिला आहे. तसेच ‘3 तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र 4 मेपासून ऐकणार नाही’, असा इशाराही दिला आहे. म्हणून आता राज्यभर होणाऱ्या महाआरतीच्या निर्णयाला स्थगिती देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


0 Comments