यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग, 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू!
जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवीकडे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला शुक्रवारी आग लागल्याने चार जणांचा मृत्यूझाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. कटराहून जम्मूला जाणाऱ्या लोकल बसला कटरापासून दीड किमी अंतरावर खरमलजवळ आग लागली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालत्या बसला भीषण आग लागली. या आगीत 4 प्रवासी जिवंत जळाले असून 22 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. बस कटराहून जम्मूकडे येत होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बसच्या इंजिनला लागलेली आग काही वेळातच पसरली आणि सर्व प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर अपघाताची एडीजीपी जम्मू यांनी ट्विट करून माहिती दिली. कटरा ते जम्मूच्या मार्गावर एक स्थानिक बस क्रमांक JK14/1831 कटरा येथून सुमारे 1 किमीवर पोहोचली होती तेव्हा तिला आग लागली. एफएसएल टीम घटनास्थळी तैनात आहे. 22 जखमींना उपचारासाठी कटरा येथे नेण्यात आले आहे.
आग इतक्या वेगाने पसरली की प्रवाशांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कसेबसे सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश आले. असे असतानाही चार प्रवासी दगावले. लोकांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
0 Comments