आईनेच 14 वर्षांच्या मुलीला ढकलले वेश्या व्यवसायात!
सोलापूर: आईने स्वतःच्या अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसात ढकलले.आईचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते त्याच्याशी मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी मुलीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलीची आई, नवरा व सासू, अशा तिघांविरुद्ध बलात्कार व त्याला सहाय्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षांची पीडिता ही आई, वडील, लहान बहीण यांच्यासह पुण्यात राहात होती. आई-वडिलांचे सतत भांडण होत होते. त्यामुळे आई नवर्यास सोडून दोन मुलींना घेऊन सोलापुरात राहण्यास आली. सोलापूर हे त्या महिलेचे माहेर आहे.
सोलापुरात त्या मुलीच्या आजीचे घर जेथे होते त्याच्या शेजारीच त्यांनी भाड्याने घर घेतले. त्या घरात ती मुलगी आई व बहिणीसह राहू लागली. सोलापुरात आल्यावर त्या मुलीच्या आईचे एका दुसर्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध जुळले. थोड्या दिवसांनी तो पुरुषसुद्धा त्यांच्या घरात येऊन राहू लागला. त्याचे राहणे हे त्या दोन मुलींना पटत नव्हते. मोठी मुलगी (वय 14) ही आईला सांगायची की, या माणसाला घरात ठेवून घेऊ नकोस, नाहीतर मी निघून जाते.
पण आईला तिचे काही पटले नाही. त्यामुळे आईने त्या मुलीस बार्शी येथील तिच्या मैत्रिणीकडे ठेवले. तेथे गेल्यावर त्या 14 वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. याविषयी जेव्हा त्या मुलीने आईकडे तक्रार केली तेव्हा तू तेथेच राहा, तू पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ते लोक तुला मारून टाकतील, असे म्हणत तिला धमकावले. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी तेथेच राहिली.


0 Comments