सोलापूर जिल्हा परिषद विजयदादा, बळीरामकाका, संजयमामासह माजी 13 अध्यक्षांचा करणार सन्मान ;
पालकमंत्री भरणेमामांची उपस्थिती
सोलापूर : जिल्हा परिषद स्थापनाचे 60 वर्ष पुर्ण झालेने त्या निमित्ताने हिरक महोत्सव साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मार्फत मागील 60 वर्षामध्ये ग्रामीण भागातील विकास व ग्रामीण भागातील नागरीकांचे राहणिमान उंचवणे व गावो गावी पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये विशेष कार्य व योगदान केलेल्या मागील 60 वर्षातील कालावधीतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
माजी अध्यक्षांमध्ये विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, काकासाहेव रामचंद्र निंबाळकर, बाबुराव मारुती जाधव, फत्तेसिंह व्यंकटराव मानेपाटील, मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, वैशाली लक्ष्मण सातेपुते, सुमन वसंतराव नेहतराव, बळीराम भाऊराव साठे, निशिगंधा प्रशांत माळी, जयमाला महादेव गायकवाड, संजयमामा विठ्ठलराव शिंदे मा.शिवानंद सिद्रामप्पा पाटील, अनिरुद्ध विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.
तसेच आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने त्या योजनेंतर्गत चांगले काम करुन सदर योजनेचे उद्दिष्ट पुर्ण केल्याने जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतीना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री यांचे हस्ते या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे.
अक्कलकोट-भुरी कवठे
बार्शी-यावली
करमाळा-सरपडोह
माढा- जामगाव
माळशिरस-यशवंत नगर,
पंढरपूर-पुळूज
मंगळवेढा-लवंगी
मोहोळ-पापरी
उत्तर सोलापूर-मार्डी
सांगोला-अकोला
दक्षिण सोलापूर-होटगी
सोलापूर जिल्ह्यामधील यशस्वी रित्या काम केलेल्या ग्रामसेवकांना सन 2017-2018 ते 2020-2021 या कालावधीतील सुमारे 44 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालक मंत्री यांचे हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे.
0 Comments