Breaking! राजू शेट्टी उद्या मंगळवेढ्यात; असा असणार दौरा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी उद्या मंगळवेढ्यात संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी येणार आहेत.
नियोजित पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घुले नगर येथे उद्या सोमवार दि.18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तानाजी (काका) बागल, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अँड.राहुल घुले, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शहाजहान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राजू शेट्टी हे आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटनेची पुढील दिशा सांगणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या काळात अनेक आंदोलने लढे होणार असून या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. उद्या होणाऱ्या संपर्क कार्यालया प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, कार्याध्यक्ष आबा खांडेकर, संघटक श्रीकांत पाटील, तालुका उपाध्यक्ष शंकर संगशेट्टी, प्रसिद्धीप्रमुख अर्जुन मुदगुल यांनी केले आहे.
0 Comments