महूद मंडल मधील सर्व जनतेला नम्र विनंती...
महाराष्ट्रा शासनाच्या महाराजस्व अभियाना अंतर्गत तालुक्यातील सर्व खातेप्रमुख अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांचे उपस्थितीत विस्तारित समाधान योजना अर्थातच प्रशासन जनतेच्या दारी हे शिबिर उद्या बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर महूद येथील श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज या ठिकाणी बुधवार(ता.27) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे.
प्रशासन जनतेच्या दारी या उपक्रमा अंतर्गत महसूल, कृषी,पंचायत समिती, पशुवैद्यकीय,आरोग्य,भूमी अभिलेख,सार्वजनिक बांधकाम,विद्युत वितरण, सामाजिक वनीकरण,एस.टी.महामंडळ, जलसंपदा,जलसंधारण, पोलीस विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यासह सर्व विभागांचे कामकाज येथे दिवसभर चालणार आहे.
यामध्ये रेशन कार्ड वितरित करणे,सेतू दाखले देणे,संजय गांधी व इंदिरा गांधी लाभार्थी अर्ज स्वीकारणे, मोफत 7/12 व 8 अ वाटप करणे, आधार कार्ड व मतदार ओळखपत्र वाटप आणि दुरुस्ती, महा डी.बी.टी.योजना अर्ज स्वीकारणे, निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व शेती अवजारांचे वाटप,फळबाग लागवड अर्ज स्वीकारणे,डाळिंब भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करणे,घरकुल व शौचालय लाभार्थी निवड,
समाज कल्याण विभागाच्या लाभार्थींची निवड,विज बिल दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, मोजणी अर्ज स्वीकारणे, एस.टी.च्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे* आदी प्रशासकीय कामे या शिबिरात होणार आहेत.महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख योजना राबविण्याचे असल्याने प्रत्येक खाते अंतर्गत असणाऱ्या योजनांचे लाभार्थी या शिबिरात निवडले जाणार आहेत.तरी महूद महसूल मंडलच्या सर्व गावांमधील लाभार्थी व नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩आपले नम्र- आमदार ॲड्. शहाजीबापू पाटील


0 Comments