google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट कसा रचला? 'ते' फोनवरील संभाषण हाती आलं, वाचा जशाच्या तस...

Breaking News

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट कसा रचला? 'ते' फोनवरील संभाषण हाती आलं, वाचा जशाच्या तस...

 शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट कसा रचला? 'ते' फोनवरील संभाषण हाती आलं, वाचा जशाच्या तस...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी जो राडा केला त्यानंतर न्यायालयात अन पोलीस चौकशीत अनेक प्रकार समोर आले. आता या प्रकरणी न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या आधी रात्री अकरा ते अडीच वाजेदरम्यान सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर तीन जणांमध्ये मिटींग झाल्याची माहिती दिली आहे. परंतु आता आता या प्रकरणातील मोठा खुलासा करणारं संभाषण समोर आला आहे.


सदर संभाषण ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागलं आहे. आणि त्यांनीच ते जनतेसमोर आणले आहे. सदावर्तेंच्या रिमांड कॉपीमध्ये सिल्व्हर ओक हल्ल्याआधी कशी अरेंजमेंट केली गेली त्याच्या फोन संभाषणाविषयी सांगितले आहे. तेच संभाषण ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागलं असल्याचा दावा न्यूज 18 लोकमतने केला आहे.


हल्ल्याच्या काही मिनिटाआधीच अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि एक एसटी कर्मचारी संदीप गोडबोले यांचे फोनवर संभाषण होतं. चला पाहूया हे काय आहे संभाषण –

अभिषेक पाटील : हॅल्लो !

संदीप गोडबोले : बोल अभिषेक

अभिषेक पाटील : तिथेच जाऊ का?

संदीप गोडबोले : हा तिथेच जायचे


अभिषेक पाटील : आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या. आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब. करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावे. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदान आहे. सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का.


संदीप गोडबोले : आता कुठे आहेत तुम्ही?

अभिषेक पाटील : इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेकट. त्यांना तिकीटना पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. ७० ते ८० महिला आणि माणसं १०० -२००


संदीप गोडबोले : महालक्ष्मी पेट्रोल पम्प कुठे आहे विचार

अभिषेक पाटील : बरं पेट्रोल पम्पावर ना? मीडिया आली

संदीप गोडबोले : मीडिया आली आहे

अभिषेक पाटील : चला मिडीआ आली भाऊ

संदीप गोडबोले : हो


दरम्यान आंदोलनकर्त्यांमधील 11 लोक मद्य पिले होते. ते त्यांना कोणी पाजले याचा शोध घ्यायचा आहे. पोलिसांनी लक्ष्मी पेट्रोल पंप, सिल्व्हर ओक, सदावर्ते यांच्या घरचे आणि कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, अशी माहिती वकील प्रदिप घरत यांनी कोर्टात दिली.

Post a Comment

0 Comments