होय , मी बैल खायचो ; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या एका विधानाने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे . आपण उघडपणे सांगतो की बैल खायचो , असे म्हणत आव्हाडांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्यांना डिवचलें आहे
आव्हाड हे जळगावात गेले होते , त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला . 2. जोपर्यंत राम गांधींचा होता , तोपर्यंत राम तत्त्वज्ञानी होता . आता राम भलत्यांच्याच हातात गेलेला आहे . तो आता सत्तेचा आणि सत्ता मिळवण्याचं कारण ठरत आहे , असेही आव्हाडांनी अधोरेखित केले आहे .
विशेष म्हणजे दिल्लीत झालेल्या मांसाहारावरही त्यांनी भाष्य केले आहे . आमच्या रक्तात शाकाहार नाही . बोकड आणि मटण खाल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही .
डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणी ऐकले आहे काय . गोवंश हत्या बंदी आणली गेली . मात्र , गायी आणि म्हशीचे मांस मुस्लिम , ख्रिश्चन आणि आम्ही कोणी खात नाही , पण उघड पणाने सांगतो आपण बैल खायचो , असेही आव्हाड म्हणाले . 4. बैल खायचो , कारण मटण महाग असल्याने परवडत नव्हते . बैलाचे मटण हे चार चार दिवस घरात शिजवलेजायचे .
आता मटण सातशे रुपये प्रति किलोवर गेल्याचेही त्यांनी सांगितले . डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणाला माहिती नाही . गोवंश हत्या बंदी आणली गेली . मात्र , गायीचे मांस मुस्लिम , ख्रिश्चन व आम्ही कोणी खात नाही . म्हशीचे मांस मुस्लिम , ख्रिश्चन व कुणीच खात नाही , पण उघड पणाने सांगतो आपण बैल खायचो , असेही त्यांनी सांगितले आहे .
0 Comments