कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राने केला ‘नकोसा’ रेकॉर्ड; बघा, नेमका काय आहे विषय
मुंबई :गेले दोन वर्षांपासून देशासह राज्यावर कोरोना नावाच्या महामारीने धुमाकूळ घातला होता. कोरोना काळात देशात लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांना बसला. दरम्यान एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात दारूची मोठ्याप्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले आहे. हाच नको असणारा विक्रम महाराष्ट्राच्या नावाने नोंदला गेला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात तब्बल 17,177 कोटी रुपयांपेक्षा अधिक दारूची विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा आकडा 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 2,358 लाख बल्क लीटर दारूची विक्री झाली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षामध्ये दारू विक्रीचे हे प्रमाण मागील तीन आर्थिक वर्षांपेक्षा अधिक होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दारूची विक्री झाली, आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 17 टक्क्यांनी दारूची विक्री वाढली.
मात्र दारू विक्री वाढून देखील दारूतून मिळणाऱ्या महसूल वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दारूच्या विक्रीमधून 18 हजार कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे टारगेट ठेवण्यात आले होते. मात्र यातील 95 टक्केच टारगेट पूर्ण झाले आहे.
0 Comments