google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दहशत! मंगळवेढ्यातील कारखान्याच्या कर्मचाऱ्यास गळा आवळून सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल लुटला

Breaking News

दहशत! मंगळवेढ्यातील कारखान्याच्या कर्मचाऱ्यास गळा आवळून सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल लुटला

 दहशत! मंगळवेढ्यातील कारखान्याच्या कर्मचाऱ्यास गळा आवळून सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल लुटला

मंगळवेढा-अकोले या मार्गावर नंबर प्लेट नसलेल्या इंडिका कारमधून आलेल्या दोघांनी दत्तात्रय आप्पा मोटे (वय ४५) या मोटर सायकलस्वारास अडवून त्याचा गळा धरून खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेवून पोबारा केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त पोलिस निरिक्षक रणजित माने यांना समजताच त्यांनी तात्काळ सर्वत्र नाकाबंदी केली मात्र रात्री उशीरापर्यंत ते दोघेही हाती लागू शकले नाहीत.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी दत्तात्रय मोटे हे युटोपियन साखर कारखाना येथे हेल्पर म्हणून कामास आहेत. दि.१ रोजी सायंकाळी ४.३० वा . मंगळवेढा येथे किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी आले. फिर्यादी हे प्लॅटिना (गाडी क्र एम एच १३ सी डब्ल्यू ५७४१) वरून ते गणेशवाडी मार्गे येवून इंडियन ऑईल पंपावरील स्वॅब मशिनवरून ३७ हजार ४०० रुपये काढून


मंगळवेढा येथे येवून १५०० रुपयांचा किराणा बाजार घेवून उर्वरीत ३९ हजार ५०० रुपये खिशात ठेवून सायंकाळी ७.२० वा. फिर्यादी परत जात असताना अचानक पांढऱ्या रंगाची इंडिका कार येवून मोटर सायकलच्या आडवी लावल्याने फिर्यादीने ब्रेक लावून मोटर सायकल थांबवली असता कारमधील दोघेजण खाली उतरून त्यातील एकाने शर्टाचे डावे खिशातील मोबाईल काढून घेतला तसेच मोटर सायकलची चावी काढून घेतली.


यावेळी त्या चोरटयाने फिर्यादीचा गळा  धरून त्यातील एकाने पँटच्या खिशात हात घालून ३९ हजार ९०० रुपये काढून घेतले. त्यातील एका आरोपीने फिर्यादीचा गळा धरल्याने दुसरा आरोपी समीर हत्यार लेके आवो असे इंडिका कारकडे बघून मोठयाने बोलला व खिशातील मोबाईल काढून घेतला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


या घटनेनंतर ते दोघे चोरटे मंगळवेढयाच्या दिशेने निघून गेले. या इंडिका कारला समोर व पाठीमागे नंबर प्लेट नव्हती. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी तात्काळ या घटनेची दखल घेवून पोलिसांच्या मदतीने शहरातील चारी बाजूला नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली मात्र इंडिका कारवाले ते दोघे चोरटे मिळून आले नाहीत.

Post a Comment

0 Comments