कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावरील 'पॅसेंजर' दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार
कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावर धावणार्या ‘पॅसेंजर’ दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे ‘पॅसेंजर’ बंद होत्या.
पूर्वीप्रमाणे सर्व ‘पॅसेंजर’ सुरू होत असून कोल्हापूर-पुणे पॅसेंजर आता यापुढे एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीला कोल्हापूर ते मिरज मार्गावर केवळ हातकणंगले हाच थांबा असून त्याचा तिकीट दरही एक्स्प्रेसचा राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून बंद असलेली रेल्वे सेवा टप्प्याटप्याने सुरू होत आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी कोल्हापूर-सातारा ही एकच पॅसेंजर सुरू केली होती. उर्वरित सर्वच पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. रेल्वेने कोल्हापूर-मिरज मार्गावरील सर्वच पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावर दैनंदिन प्रवास करणार्या नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार प्रवाशांची संख्या अधिक आहे. नोव्हेंबरपासून पॅसेंजर सुरू केली. मात्र, ती कोल्हापुरात येणार्यांसाठी सोयीची होती. मिरज, सांगलीला जाणार्यांंसाठी ती गैरसोयीची आहे. त्यामुळे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने सुरू होती.
सर्व गाड्या पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापुरातून मिरजेला येण्यासाठी व मिरजहून कोल्हापूरला जाण्यासाठी रात्री उशिरा रेल्वेगाड्या उपलब्ध होणार आहेत.
अशा आहेत कोल्हापूरहून मिरजेला येणार्या गाड्या
कोल्हापूर-मिरज (प्रस्थान सकाळी १०.३० वा.)
कोल्हापूर-सातारा (प्रस्थान दुपारी ४.५० वा.)
कोल्हापूर-सांगली (प्रस्थान सायंकाळी ६.४० वा.)
कोल्हापूर-मिरज (प्रस्थान रात्री ९.५० वा)
मिरजेहून कोल्हापूरकडे जाणार्या
सातारा-कोल्हापूर (आगमन सकाळी ९.५५ वा.)
मिरज-कोल्हापूर (आगमन दुपारी ३.३० वा.)
मिरज-कोल्हापूर (आगमन सायंकाळी ६.१० वा.)
सांगली-कोल्हापूर (आगमन रात्री १०.२०)
0 Comments