google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतमालकानेच केला महिलेवर सामुहिक बलात्कार ; खुद्द नवऱ्यानेच दिली बलात्कार करणाऱ्यांना साथ

Breaking News

शेतमालकानेच केला महिलेवर सामुहिक बलात्कार ; खुद्द नवऱ्यानेच दिली बलात्कार करणाऱ्यांना साथ

 शेतमालकानेच केला महिलेवर सामुहिक बलात्कार ; खुद्द नवऱ्यानेच दिली बलात्कार करणाऱ्यांना साथ

लातूर, 16 एप्रिल : पती आणि पत्नीच्या नात्याला  काळीमा फासणारी मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार  केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर  जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे.दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील मदत मिळाली नाही.


 अखेर पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनंतर पतीसह तिघांविरुद्ध औसा पोलिसांत बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेली एक 32 वर्षीय महिला पतीसह औसा तालुक्यातील सारोळा रोडवर असलेल्या एका पानमळ्यात सालगडी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी या पती-पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे ही महिला लातुरातील आपल्या आईकडे वास्तव्यास होती.


वाद निवळल्यानंतर पीडित महिलेच्या आईने 9 एप्रिल रोजी या महिलेस पतीकडे नेऊन सोडले. रात्री 9 वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या पतीने पानमळ्याचे मालक असलेले इल्लु शेख आणि मुसा शेख या दोघांना घरी आणले आणि त्यांना स्वतःच्या पत्नीवर अत्याचार करण्यास सांगितले. त्यानुसार पतीसमोरच या महिलेवर दोघांनी अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिला घटनास्थळावरुन मध्यरात्री बाभळगाव नाक्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्यात विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले.


परंतू, त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सदर महिला आईला सोबत घेवून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. स्वतःवरील अत्याचाराची कर्मकहाणी ऐकवल्यानंतर त्यांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी पतीसह अन्य दोघांविरुद्ध औसा पोलिसांत भादंवि तसंच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments