संजय गांधी निराधार योजनेची प्रशासनाने जनजागृती करावी- माजी सभापती राहुल कुमार काटे
सांगोला प्रतिनिधी शासनाने निराधार अपंग यासह इतर निराधार लोकांसाठी वृद्धापकाळामध्ये आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना अपंगासाठी पेन्शन योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी या योजना सुरू केलेल्या आहेत परंतु या योजना सामान्य खऱ्या गरजू लोकापर्यंत व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही तरी या महत्वपूर्ण योजनांची माहिती व जनजागृती प्रशासनाने करावी अशा पद्धतीची मागणी सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती राहुलकुमार काटे यांनी केलेले आहे
वरील योजनांची माहिती प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तलाठी यांनी जनजागृती केली पाहिजे वरील योजनांची माहिती, व त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासह सर्व बाबींची माहिती त्या गावातील गरजू लोकापर्यंत पोहोचवली पाहिजे ही माहिती जर सामान्य लोकांपर्यंत पोहोचली तर याचा सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे व तालुक्यामध्ये बनावट एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे
हे एजंट गरजू सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत ही होणारी फसवणूक थांबविण्यासाठी व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने याबाबतची जनजागृती केल्यास खऱ्या अर्थाने ज्या उद्देशासाठी शासनाने या योजना तयार केलेल्या आहेत त्या योजना पूर्ण होतील व खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांना याचा लाभ होईल तरी संबंधित प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन सामान्य नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी जनजागृती करावी याबाबतची मागणी सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती राहुलकुमार काटे यांनी केलेली आहे.
वरील केलेल्या मागणीचे तालुक्यातील सामान्य नागरिकाकडून स्वागत केले जात आहे.


0 Comments