google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मद्यपान करून लावलेल्या शर्यतीने घेतला तरुणाचा जीव !

Breaking News

मद्यपान करून लावलेल्या शर्यतीने घेतला तरुणाचा जीव !

 मद्यपान करून लावलेल्या शर्यतीने घेतला तरुणाचा जीव !

पुणे : पोहोण्याची पैज लावण्यात आली आणि ही पैज जिंकण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा जीव गेल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथील घडली आहे. 


सळसळत्या उत्साहाचे तरुण एकत्र आले की अनेकदा वेगवेगळ्या पैजा लावतात आणि मग ही पैज  जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावले जाते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर देखील पुरात पोहून पलीकडील तीरावर जाण्याच्या शर्यती लावल्या जातात. अशा शर्यतीत अनेकदा जीवालाही धोका होण्याची शक्यता असते आणि तशा प्रकरच्या धोकादायक घटना अनेकदा घडल्या असून काही जणांना शर्यतीत प्राण गमाविण्याची देखील वेळ आलेली आहे. असे असतानाही पुन्हा मित्रांनी पोहोण्याची पैज लावली आणि यात एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला असल्याची घटना घडली. 


मेडिकल दुकानात औषधांचा पुरवठा करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष संभाजी जाधव या तरुणाच्या जीवावर ही शर्यत बेतली आहे. डीलरच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती.  पार्टीच्या निमित्ताने काही मित्र एकत्र आले होते. संतोष हा त्याच्या मदतनिसाच्या सोबत गेला होता आणि त्याने इंद्रायणीच्या काठी मद्यपान देखील केले.  यावेळी संतोष आणि त्याच्या गाडीवर असलेल्या मदतनिसात इंद्रायणी नदीत पोहण्याची शर्यत लागली. नदीत पोहत नदीपात्राच्या पलीकडील तीरावर कोण आधी पोहोचतेय यासाठी त्यांनी शर्यत लावली.


संतोष आणि त्याचा सहकारी हे दोघेही शर्यत जिंकण्याच्या इराद्याने इंद्रायणी नदीत उतरले. संतोषने आधीच मद्यपान केलेले होते त्यात पोहून जाण्याची शर्यत सुरु झाली होती. दोघेही पोहत पोहत नदीच्या अर्ध्या पात्रापर्यंत गेले पण अर्ध्यावर गेल्यावर संतोष याला दम लागलेला होता. त्याला व्यवस्थित पोहोताही येत नव्हते. मागे येत येत नव्हते आणि पुढेही जाता येत नव्हते अशी त्याची अवस्था झाली आणि  दम लागून तो पुरता थकून  गेला होता.   त्यातच तो इंद्रायणी नदीत वाहून गेला. 


मृतदेह हाती आला !

पोहता पोहता संतोषला दम लागल्याने तो पाण्यात वाहून गेला पण नंतर तो कुणालाच दिसला नाही . पाण्यात तो अदृश्य झाला होता. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर तब्बल पंचवीस तासांनी त्याचा मृतदेह हाती आला. 


मद्यपान केले म्हणून --

वाढदिवसाच्या पार्टीसाठी म्हणून गेले होते पण मद्यपान केल्यामुळे त्यांच्यात ही जीवघेणी स्पर्धा लागली  आणि स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेपोटी दोघांनी पात्रात उडी घेतली. मद्यपान केले नसते तर कदाचित अशी स्पर्धा झाली नसती आणि पैज जिंकण्यासाठी असे जीवघेणे धाडस केले  नसते अशी चर्चा सुरु झाली आहे.

Post a Comment

0 Comments