google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घरात सुरु होती लग्नाची तयारी, मुलीच्या कन्यादानापूर्वीच बापाचं डोकं कापले.

Breaking News

घरात सुरु होती लग्नाची तयारी, मुलीच्या कन्यादानापूर्वीच बापाचं डोकं कापले.

 घरात सुरु होती लग्नाची तयारी, मुलीच्या कन्यादानापूर्वीच बापाचं डोकं कापले.

औरंगाबाद : बिहारमधील औरंगाबाद मधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे ज्या घरात मुलीचे हात पिवळे करण्याची तयारी सुरू होती, त्याच घरात शोककळा पसरली.मुलीचं कन्यादान करण्यापूर्वीच वडिलांच्या मृत्यूमुळे कुुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शनिवारी रात्री थ्रेसर मशीनमध्ये डोकं अडकल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हे वृत्त गावात पसरताच खळबळ उडाली. घरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडलं आहे.


मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. परसा गावात अर्जुन भुईया याचं 35 वय होतं. ते गावात जयराम शर्माच्या ट्रॅक्टरमध्ये लावलेल्या थ्रेसर मशीनने शेत कापणीचं काम करीत होता. शनिवारी ते घरातून जेवण करून शेत कापणीसाठी निघून गेला.जाताना सकाळीच येणार असल्याचं त्याने सांगितलं. तो रात्रीच्या वेळेत शेत कापत होता. अचानक त्याचं डोकं थ्रेसर मशीनमध्ये अडकलं. काही करेपर्यंत त्याचं डोकं मशीनने कापलं गेलं होतं.


रक्तबंबाळ होऊन तो तेथेच पडला. डोक्याला इतकी गंभीर जखमी झाली की, त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. हे ही 3 लाख आणि कार दिली नाही म्हणून पत्नीला सोडलं, मुंबईत घडली ची घटना  याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे पाहून लोक हैराण झाले. कोणाला काहीच कळत नव्हतं. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.


पोलिसंनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला.  अर्जुनच्या मुलीचं 17 एप्रिलला लग्न होणार होतं. कुटुंबात मुलीच्या लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. घरात तयारी सुरू होती. नातेवाईकांना कार्डही पाठवण्यात आली होती. मात्र यादरम्यान अर्जुनच्या मृत्यूमुळे आनंदावर विरजण पडलं. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बापाच्या मृत्यूमुळे मुलीला जबर धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments