सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर : आमदार शहाजीबापू पाटील
मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदान सुशोभीकरण व रस्त्यासाठी २ कोटी मंजूर
सांगोला: (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यामध्ये सांगोला शहरातील मुस्लिम समाजाची ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ईदगाह मैदान सुशोभीकरण व रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यापूर्वी ईदगाह मैदान कुंपणभिंतीच्या कामासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून 25 लक्ष रुपये आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर केले होते या निधीतून काम पूर्णही झाले आहे परंतु संपूर्ण काम करण्याकरिता सुमारे दीड कोटी रुपयांची गरज होती यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी खास बाब म्हणून दीड कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. त्यामुळे अत्यंत प्रशस्त व सुसज्ज असे ईदगाह मैदान तयार होणार असल्याने तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यांमध्ये मंजुरी मिळाल्याबद्दल अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.
याबरोबर : १) सांगोला क्रीडा संकुल शेजारील (ईदगाह मैदान) बायपास रोड ते पुजारवाडी रोड पर्यंत ९ मीटर डी.पी. रोड डांबरीकरण करणे ५० लाख., २) चिंचोली रोड येथील ९ मीटर डी.पी. रोड सर्वे नंबर ५१६ व ५१७ मधील रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख., ३) एखतपुर रोड ते ईदगाह मैदान पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे २० लाख., ४) पुजारवाडी येथील सुधीर आहेरकर घर ते दीपक शिंदे घर ते बाळू जाधव घर ते नंदू जाधव घर ते मारुती बनकर घर ते पुजारवाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूंनी कॉंक्रिट गटार व डांबरीकरण करणे ४३ लाख., ५) मिरज पंढरपूर रोड ते सिद्धिविनायक हाईट्स अपार्टमेंट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख., ६) सांगोला नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर करणे ५० लाख., ७) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे (टाऊन हॉल) नूतनीकरण करणे १ कोटी., ८) नगरपरिषद मालकीच्या गाळ्यांच्या फर्निचर करून अभ्यासिका तयार करणे २७ लाख इत्यादी ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना वरील प्रमाणे निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांची सुरुवात करून वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना दिल्या आहेत.


0 Comments