आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, इलेक्ट्रो होमिओपॅथी, डॉक्टरांना बोगस म्हणाल तर देशभर आंदोलन छेडू ! – डॉ.अमीर मुलाणी.
पुरावे सादर करा अन्यथा : न्यायालयात जाणार
सोलापूर जिल्ह्यात काही वर्तमानपत्रांनी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस म्हटलं आहे दिनांक २१/०४/२०२२ रोजी च्या एका दैनिकात बातमी प्रकाशित करण्यात आली होती. तुम्ही जर या सर्व डॉक्टरांना बोगस मानत असाल
तर तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करावेत तुम्ही जर पुरावे सादर केले नाहीत तर आयुष भारत संघटना देशभर आंदोलन छेडणार आहे या आधी पण बऱ्याच पत्रकारांकडून डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झालेला आहे जर हा ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बंद नाही
झाला तर आम्ही सर्व हॉस्पिटल बंद करून रस्त्यावरती उतरून देशभर आंदोलन करू एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषणा करत आहेत कि आयुर्वेद होमिओपॅथी युनानी नॅचरोपॅथी या पॅथीचा देशामध्ये प्रसार आणि प्रचार व उपचार होणे खूप गरजेचे आहेत याचं पॅथीना काही पत्रकारांकडून बोगस म्हटले जात आहे ही गोष्ट खूप दुर्दैव याची आहे. बोगस कोणाला म्हणावं याचे भान सोडून दिले
का मान्यताप्राप्त विद्यापीठातून रितसर डिग्री डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आहे तरीपण बोगस का ऍलोपॅथी प्रॅक्टीस करण्याचा अधिकार आहे तरीपण बोगस का गव्हा सोबत किडे रगडणे बंद करावे. जिल्ह्यात कोणते डॉक्टर बोगस आहेत नाव पत्ता व सर्व माहिती पुराव्यासह सादर करावी सर्वांना बोगस म्हणणे ही गोष्ट चुकीची आहे
प्रशासनाने यावरती दखल घ्यावी अन्यथा सर्व हॉस्पिटल बंद करून आंदोलन छेडण्यात येईल आम्ही आज पर्यंत कोणावर अन्याय केला नाही आणि आमच्या वरती बऱ्याच वेळा अन्याय करण्यात आले आहे अन्याय आता मुळीच सहन करणार नाही. यावरती आम्हाला प्रशासनाने न्याय नाही दिला तर आम्ही अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहोत. आयुर्वेद होमिओपॅथी इलेक्ट्रो होमिओपॅथी युनानी या पॅथीना माननीय सुप्रीम कोर्ट,
माननीय हाय कोर्ट व बऱ्याच कोर्टाचे राज्य शासनाचे केंद्र शासनाचे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचे आदेश आहेत. हे सर्व पुरावे आम्ही सादर करण्यासाठी तयार आहोत विनाकारण चुकीच्या बातम्या छापून डॉक्टरांना बदनाम करू नये असे केल्यास आयुष भारत संघटना देश भर आंदोलन छेडणार आहे. असे आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले .


0 Comments