काळेवाडी सोसायटी संचालकाचे सदस्यत्व रद्द करा कैलास सरगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
आटपाडी तालुक्यातील काळेवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य व विद्यमान अध्यक्ष विठ्ठल कुंडलिक सरगर यांना २००१ नंतर ३ अपत्य असतानाही निवडणूक लढवली आहे .
यात त्यांनी शासनाची तसेच निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करून सहकार कायद्याअन्वये कायदेशीर कारवाई करुन त्यांना पदावरून बडतर्फ करावे , अशी मागणी कैलास सरगर यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केलीआहे . कैलास सरगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,
काळेवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत विठ्ठल कुंडलिक सरगर हे सदस्य म्हणून आहेत . त्यांना २००१ नंतर जन्माला आलेली ती अपत्य आहेत . तरीही सदर व्यक्तीने शासनाची व निवडणूक आयोगाची फसवणूक करून सोसायटीची निवडणूक लढवून सदस्य झाले आहेत . त्यामुळे त्यांना ३ अपत्यआहेत . त्याचे पुरावेही कैलास सरगर यांनी जमा केले आहेत .
ते पुरावे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी यांना दिले आहेत . हा प्रकार गंभीर असून त्यांची कायदेशीर चौकशी करून तातडीने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे . त्यांनी शासनाची व निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर सहकार कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी केली आहे .



0 Comments