तंबाखू दिली नाही म्हणून मारहाण, एकाचा मृत्यू,
अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कल्याण लाला लांडगे यांचा खून झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा करण कल्याण लांडगे याने अकलूज पोलीस स्टेशन येथे दिली आहे. अकलूज पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 295/2022 भा द वि 302, 506 कलम प्रमाणे पहाटे 3.28 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी ने पुढील प्रमाणे जबाब नोंदवला आहे.
फिर्यादी जबाब ता. १७/०४/२०२२ मी करण कल्याण लांडगे, वय २२ वर्षे, हिंदु महार, धंदा- शिक्षण व कामगार, रा.मौजे श्रीपूर, राजश्री शाहुनगर, ता.माळशिरस समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देतो की मो.नं. ९२०६९५१३१३ मी वरीलप्रमाणे
असुन दिलेल्या पत्त्यावर माझे वडील कल्याण, आई रेश्मा, चुलते सतिश, प्रकाश व त्यांचे कुटुंबिय असे एकत्रात राहण्यास असून मी शिक्षण घेत पांडूरंग सहकारी साखर कारखाण्यामध्ये कंत्राटी पध्दतीने कामगाराचे काम करतो व त्यापासून मिळणारे उत्पन्नावर माझे परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. माझे वडिल नामे कल्याण लाला लांडगे हे सुध्दा पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर येथे कामगार म्हणून काम करतात.
त्यांना दारू पिण्याची सवय आहे तसेच आमचे शेजारी राहणारा महेश नामदेव रणपिसे हा व माझे वडिल कल्याण लाला लांडगे हे दोघेजण एकमेकांस सोबत त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादावरून बोलत नव्हते. तसेच बाबासाहेब भोसले हा मौजे महाळुंग येथे राहत असून त्याचीही माझे वडिलांसोबत ओळख आहे. माझे वडिल कल्याण लाला लांडगे हे वंचित बहुजण आघाडी या पक्षाचे श्रीपूर परिसरात काम करीत होते. दिनांक १६/०४/२०२२ रोजी सायंकाळी ०६/००
वाजताचे सुमारास घरातुन बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेले होते व ते सायंकाळी ०८/१५ वाजताचे सुमारास परत घरी आले. त्यावेळी त्यांचा दारू पिल्याचा वास येत होता. त्यानंतर त्यांनी जेवण केले व मला त्यांचे अंग चोळण्यासाठी सांगुन स्वता: जमीनीवर पोटावर झोपले. मी त्यांचे अंग चोळत असताना त्यांनी मला सांगितले की, ते आमचे घराचे शेजारी असलेल्या शक्ती वाईन शॉप जवळ बसले असताना बाबासाहेब भोसले त्या ठिकाणी आला त्यावेळी तोही दारू पिल्याला होता.
त्याने त्यांना तंबाखु खाण्यासाठी मागितली. त्यांनी बाबासाहेब भोसले याला तंबाखू दिली नाही याच कारणावरून त्याने त्यांना हाताने व कोल्हापूरी चप्पलने डोक्यात, पाठीत, छातीवर मारहाण केली व मारहाण करीत असताना “थांब 08.२० वा. महेश रणपिसे येवूदे तुला दाखवतो” असे म्हणत होता. त्यानंतर बाबासाहेब भोसले तेथून निघुन गेला व माझे वडिल कल्याण लांडगे हे आमचे घरी आले.
मी वडिलांचे अंग चोळल्यानंतर हात धुण्यासाठी घरातील बाथरूममध्ये गेलो व त्यांना सरळ झोपण्यासाठी सांगितले. परंतु माझे वडिल कल्याण लांडगे हे सरळ झोपले नाहीत म्हणुन मी त्यांना सरळ करून पाठीवर झोपवले.
त्यावेळी त्यांचे तोंड काळे पडले होते. जीभ दाताखाली अडकुन काळी पडली होती, त्यांच्या कपाळावर व चेह-यावर मारहाणीचे व्रण दिसत होते. तसेच ते काहीच बोलत नसल्याने मी त्यांच्या तोंडात फुकर मारली म्हणुन त्यांनी लगेच उलटी केली. त्यांची तब्बेत बिघडल्याने मी, चुलत भाउ प्रतिक लांडगे व सत्यप्रिय लांडगे असे चारचाकी वाहनाने त्यांना पूढील औषोधोपचाराकरीता अकलुज येथील अकलाई हॉस्पीटल येथे घेवून आलो. दिनांक १७/०४/२०२२ रोजी ००/१५ वाजताचे सुमारास डॉक्टरांनी इसीजी काढला व माझे वडिल कल्याण लांडगे हे मयत झाले असल्याचे सांगितले.
तरी दिनांक १६/०४/२०२२ रोजी सायंकाळी ०८/१५ वाजताचे पुर्वी आमचे शेजारी असणारे शक्ती वाईन शॉप श्रीपूर याठिकाणी माझे वडिल कल्याण लाला लांडगे यांना बाबासाहेब भोसले यांनी तंबाखू खाण्यासाठी दिली नाही या कारणावरून हाताने व कोल्हापूर चप्पलने मारहाण केली त्यामध्ये माझे वडिलांचा खुन झाला आहे. म्हणुन माझी बाबासाहेब भोसले याच्याविरुद्ध फिर्याद आहे. माझा वरील फिर्यादी जबाब मी वाचुन पाहिला तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर लिहला आहे. हा फिर्यादीने अकलूज पोलीस स्टेशन येथे जबाब लिहुन दिला आहे. याबाबत कुणाला ही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सपोनि मारकड करीत आहेत.
0 Comments