प्रवास करताना आता ‘हे’ सर्टीफिकेट नसल्यास; ‘इतक्या’ रूपायांचा होणार दंड वसूल…..
सोलापूर – रस्त्यावर आणि महामार्गावर धावणारे वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे. वाहनांमध्ये छोटासा बिघाड झाल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे. मात्र मागील वर्षभरात सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या ७११ वाहनांवर कारवाई करून १३ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवासी व मालवाहतूक वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट करून घेणे आवश्यक आहे. मालवाहतूक वाहने लांबचा प्रवास करीत असतात वाहनांची नियमित देखभाल- दुरुस्ती केलेली नसते त्यामुळे वाहने रस्त्यावर धावत असताना अपघात होण्याची शक्यता असते.सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या फिटनेसची तपासणी केली असता.
वाहनांच्या ब्रेकपासून ते लाईट, टायर व तांत्रिक बाबींची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले आहे. वाहन रस्त्यावर धावण्यासाठी व्यवस्थित असल्याचे योग्यता प्रमाणपत्र मिळते. फिटनेस नसल्यास प्रतिवाहन दंड आकारला जातो. त्यानंतर दिवसाला शंभर रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments