आकाशातून सँटेलाइट लोखंडी रिंग जमिनीवर “या” ठिकाणी कोसळली;
रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी, पोलिसांनी रिंग घेतली ताब्यात!
चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावी आज रात्री 10 वाजताच्या सुमारास सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. ही रिंग पडताच लोकांची एकच गर्दी झाल्याने रिंग पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 7.45 ते 8 वाजताच्या सुमारास आकाशातून उल्का वर्षाव झाल्यासारखे रांगेत लाल गोळे जमिनीच्या दिशेने आले.आकाशात लाल गोळे बघून लोकांनी कुतूहलाने त्याकडे बघितले. चंद्रपूर खगोल अभ्यासक डॉ. योगेश दूधपाचारे यांना गोंडपिपरी, धाबा भागात ही घटना झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, तिथे फक्त लाल गोळे दिसल्याचे लोकांनी सांगितले आहे.
परंतु, रात्री 10 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे एक मोठी लोखंडी रिंग पडली. ही रिंग आकाशातून कोसळलेल्या सँटेलाइटची असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशातून पडलेली ही रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच, ही रिंग 8 ते 10 फूट मिटरची आहे.सिदेवाही पोलिस ठाण्यात हि रिंग जमा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, ग्लोबल वॉर्मिग मुळे सोलर डस्ट तयार झाल्याने आकाशातून सँटेलाइट जमिनीवर कोसळले होते. त्याचेच काही भाग राज्यात काही ठिकाणी पडले आहेत. त्यापैकीच ही लोखंडी रिंग असावी असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले आहे.
0 Comments