google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऑनलाईन खेळात हरल्यामुळे अभियंता तरुणाची आत्महत्या !

Breaking News

ऑनलाईन खेळात हरल्यामुळे अभियंता तरुणाची आत्महत्या !

 ऑनलाईन खेळात हरल्यामुळे अभियंता तरुणाची आत्महत्या !

पंढरपूर : पब्जी या ऑनलाईन खेळात हरल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील एका उच्चशिक्षित तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशा घटनामुळे पालकांच्या चिंतेत वाढ होऊ लागली आहे. 


गेल्या काही वर्षांपासून प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे अधिक सुविधा झाली आहे परंतु या सुविधेचा अयोग्य वापर अधिक प्रमाणात होत असून गैरवापर करणाऱ्यात तरुण मुलांचा अधिक समावेश आहे. अशा अयोग्य वापरामुळे आजवर अनेक वाईट आणि अप्रिय घटना घडल्याचे समोर आलेले आहे.


 अनेक तरुण ऑनलाईन गेम खेळण्याच्या  मोहात पडतात आणि त्याचा शेवट हा वाईट झालेलाच दिसून येतो. पालकांचे दुर्लक्ष झाल्याने तर हमखास अशा घटना घडताना दिसून येतात. अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्याऐवजी तरुण मुले ऑनलाईन गेम खेळत बसतात आणि त्यातून पुढे काय घडते हे सुस्ते येथील तरुणाच्या आत्महत्येने आणखी एकदा समोर आले आहे. 


सुस्ते येथील २७ वर्षे वयाचा तरुण ओंकार नारायण सालविठ्ठल हा काही कामाच्या निमित्ताने वेळापूर येथे गेला होता. ओंकार याला पब्जी या ऑनलाईन खेळाचा नाद लागलेला होता. हा खेळ खेळत असताना १८ एप्रिल रोजी तो या खेळात हरला आणि त्यामुळे तो प्रचंड नैराश्यात गेला. 


या नैराश्यातून त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी त्याला लगेच अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु काल उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत माहिती मिळताच पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून सुस्ते परिसरात हळहळ  व्यक्त करण्यात येत आहे. 


ओंकार सालविठ्ठल हा तरुण उच्चशिक्षित होता आणि  त्याने गोपाळपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती. अभियंता झालेल्या या तरुणाने केवळ ऑनलाईन खेळ हरल्यामुळे आपल्या जीवनाचा शेवट केल्याने अनेकांना धक्का बसला असून सुस्ते परिसरात याबाबत बरीच चर्चा देखील सुरु झाली आहे.

Post a Comment

0 Comments