क्षत्रिय माळी वि.का. सह संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ७० वर्षात प्रथमच सत्तांतर ; चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन राऊत
सांगोला : तालुका प्रतिनिधी कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि आदर्श कारभार असलेली क्षत्रिय माळी वि.का. सह संस्थेमधे स्थापनेनंतर म्हणजेच 1952 नंतर प्रथमच सत्ताबदल झाला आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या विकास सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकविला असून संस्थेच्या चेअरमनपदी मोहन शंकर राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
क्षत्रिय माळी विकास सेवा सेवा सहकारी संस्थेवर सुरुवातीपासूनच शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. शेतकरी कामगार पक्षतील अनेक नेतेमंडळींनी या सहकारी संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. 1952 रोजी सहकारी संस्था स्थापन झाली होती. स्थापनेपासून कधीच संस्थेत निवडणूक किंवा सत्ताबदल झाला नव्हता
यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने या संस्थेत जोरदार मुसंडी मारत थेट चेअरमन पदापर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून वसंत पांडुरंग बाईलभिंगे महादेव निवृत्ती बनकर सुधाकर शंकर वाघे विलास जगन्नाथ नवले सुमन सुखदेव नवले व चेअरमन पदी निवड झालेले मोहन शंकर राऊत यांची क्षत्रिय माळी विकास सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड झाली आहे.
दरम्यान नूतन चेअरमन मोहन शंकर राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजयाचे शिल्पकार माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, माजी नगरसेवक विजय राऊत, नाथा जाधव, के एन राऊत, विनायक राऊत, चैतन्य राऊत, दत्तात्रय फुले, दशरथ राऊत, भारत वसेकर आदींसह अन्य उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन मोहन राऊत म्हणाले, सर्वांना सोबत घेवून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय माळी वि.का. सह संस्थेची दैदिप्यमान परंपरा कायम ठेवून संस्थेला एका उंचीवर घेवून जावू असा विश्वास व्यक्त केला.


0 Comments