google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! ठाण्यातील उत्तरसभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय घडलं?

Breaking News

मोठी बातमी! ठाण्यातील उत्तरसभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय घडलं?

 मोठी बातमी! ठाण्यातील उत्तरसभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय घडलं?

 ठाण्यात मंगळवारी (12 एप्रिल) मनसेची उत्तरसभा झाली. या सभेनंतर आता नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे, 13 एप्रिल : गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा  आयोजित केली. ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी  आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, आता याच सभेवरुन राज ठाकरे अडचणीत येताना दिसत आहे.


सभेसाठी मंचावर येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा सत्कार केला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी तलवार हाती घेतल्याचं दिसून आलं. सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा सत्कार करताना दिलेली तलवार म्यान मधून काढून उंचावून दाखवल्याने भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 व 5 नुसार ठाणे नौपाडा पोलीसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल


गेल्या महिन्यात राज्याच्या शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड  आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  या दोन्ही मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज  यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबईत काही दिवसांपूर्वी एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर आपल्या हातात तलवार घेतली होती. या दोघांचे तलवारीसह फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments