google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवीन वाळू धोरण! सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेके गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याच्यादृष्टीने जाहीर; चार वाळू साठ्यांसाठी फेरलिलाव

Breaking News

नवीन वाळू धोरण! सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेके गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याच्यादृष्टीने जाहीर; चार वाळू साठ्यांसाठी फेरलिलाव

 नवीन वाळू धोरण! सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेके गरिबांना स्वस्तात वाळू

उपलब्ध होण्याच्यादृष्टीने जाहीर; चार वाळू साठ्यांसाठी फेरलिलाव

तब्बल ६९ कोटीला गेलेले  सोलापूर जिल्ह्यातील चार ठिकाणचे वाळू लिलाव शासनाच्या नवीन धोरणामुळे रद्द करून आता पुन्हा नव्याने फेरलिलाव काढण्यात आले आहेत.


यापूर्वीचे लिलाव रद्द केल्यामुळे प्रशासनाला ६९ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. अर्धनारी-बठाण येथील साठा क्रमांक-१ साठा क्रमांक-२ साठा क्रमांक ३ आणि अर्धनारी या चार वाळू साठ्यांचा लिलाव प्रक्रियेमध्ये समावेश आहे. तीन वर्षांपासून रखडलेल्या वाळू लिलावाला जानेवारीत मुहूर्त मिळाला होता. प्रशासनाने नऊ ठिकाणचे वाळू लिलाव काढले होते. त्यापैकी सात ठिकाणच्या वाळू साठ्याचा लिलाव झाला होता. या वाळू लिलावातून शासनास ६९ कोटीचा महसूल मिळाला होता.


गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याच्यादृष्टीने नवीन वाळू धोरण जाहीर मात्र शासनाने गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याच्यादृष्टीने नवीन वाळू धोरण जाहीर केले. ठेकेदारांनी नवीन धोरणाप्रमाणे ताबा द्या किंवा लिलाव रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार लिलाव रद्द करून आता नवीन धोरणानुसार चार वाळू साठ्याचा फेरलिलाव केला जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या लिलाव प्रक्रियेत सहभागी ठेकेदारांनी २५ टक्क्याप्रमाणे १८ कोटी जमा केले होते. आता नव्याने जाहीर केलेल्या फेरलिलावात याच मक्तेदारांनी सहभाग घेतला तर त्यांचे १८ कोटी या लिलावात समायोजित केले जाणार आहेत.


त्यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला नाही तर रक्कम परत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वाळू लिलावासाठी १३ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया चालू झाली असून ती २८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. २९ एप्रिल रोजी ई-लिलावाची प्रक्रिया होणार आहे.

Post a Comment

0 Comments