google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा पोलीस आऊट पोस्ट | असून अडचण नसून खोळंबा आऊटपोस्ट कायम सुरु करावे ; ग्रामस्थांची मागणी

Breaking News

कोळा पोलीस आऊट पोस्ट | असून अडचण नसून खोळंबा आऊटपोस्ट कायम सुरु करावे ; ग्रामस्थांची मागणी

 कोळा पोलीस आऊट पोस्ट | असून अडचण नसून खोळंबा आऊटपोस्ट कायम सुरु करावे ; ग्रामस्थांची मागणी

कोळा ( वार्ताहर ) : - सांगोला तालुक्यातील कोळा येथे ग्रामीण भागातील पोलीस आउट पोस्ट कडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत . ते सध्या कायम बंद अवस्थेत असून अडचण नसून खोळंबा असल्याचे चित्र दिसत असून सदरचे आऊटपोस्ट हे दररोज सुरू ठेवावे अशी मागणी नागरिक व ग्रामस्थांतून होत आहे 


 कोळा , डोंगर पाचेगाव , किडबिसरी , जुनोनी , गौडवाडी , कराडवाडी , कोंबडवाडी , तिप्पेहाळी , जुजारपूर हटकर मंगेवाडी , गुणापवाडी , हातीद या आदी गावातील परिसरातील १३ गावांमध्ये नागरिकांना तक्रार करायची म्हटलं तर ४५ किलोमीटरअंतरावर असलेल्या सांगोला पोलीस स्टेशनला जावे लागते आहे . मात्र , औट पोस्ट बंद असल्याने नागरिकांना किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा सांगोल्याला जावे लागत आहे . पोलीस कर्मचारी यांचा सांगोल्यातून कारभार चालू असल्याचे नागरिक सांगत असतात . 


आठवड्यातून किमान ४-५ दिवस चालू राहावे यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष घालून औट पोस्टमध्ये पोलिस कायमस्वरूपी दररोज सुरू ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे . सांगोला पोलीस ठाण्याच्या कोळा पोलीस आउट पोस्ट अंतर्गत परिसरातील अनेक गावांचा समावेश आहे . येथे काही अनुचितप्रकार घडल्यास फिर्याद देण्यासाठी नागरिक या और पोस्टमध्ये जातात बंद असल्याने नागरिकांना सांगोल्याला जावे लागत आहे .


 दरम्यान , भागातील गावांची लोकसंख्या व क्राईम रेट पाहता या औट पोस्टमध्ये पोलिस कर्मचारी सांगोल्यात थांबण्यापेक्षा कोळे गावात दररोज असणे गरजेचे आहे . पोलीस कर्मचारी सांगोला येथून काम पाहत असल्याने पोलिसांअभावीच चौकी बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे . पोलिसांचे आउट पोस्ट कडे दुर्लक्ष होत असून , हे औट पोस्ट दररोज उघडले जावे असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे .


 परिसरात अनेक वेळा किरकोळ स्वरूपाच्या घटना असतात . या परिसरात पोलिसांची तत्पर सेवा मिळत नसल्याने भुरट्या चोऱ्यांच्या स्वरूपाच्या घटना वाढत असून , नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कोळा आऊट पोस्ट चौकी कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी विनंती ग्रामस्थांची आहे .

Post a Comment

0 Comments