महुद येथे युवा सेनेच्या वतीने” थाळी बजाव” आंदोलन
महूद /प्रतिनिधी युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने महूद ता. सांगोला येथे सांगोला तालुका युवा सेनेच्या वतीने आज सकाळी दहा वाजता इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकार विरोधात युवासेना सांगोला तालुका प्रमुख सुभाष भोसले, युवा सेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांच्या नेतृत्वात व शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.देशात इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे गृहिणींचंही बजेट कोसळलं आहे.
दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात महुद तालुका सांगोला येथील ऋतुराज पेट्रोल पंपासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थाळी बजाव आंदोलन केले. घरगुती गॅस , पेट्रोल आणि डिझेल दरवाढ विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे हे आंदोलन आहे,असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.यावेळी केंद्र सरकारविरोधात युवा सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,
युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले,माजी उपतालुकाप्रमुख नितिन वडे, उपतालुकाप्रमुख गणेश कांबळे, युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, सचिन जाधव, प्रकाश जाधव, संतोष खडतरे, ऋतिक वडे, अस्लम मुलाणी, सचिन सुरवसे, विजय पारसे, आण्णा गाडवे, विक्रम मासाळ, शिवराज घालमे, माऊली गाडवे, शंकर पवार, प्रकाश मुळे, सागर पवार, महेश गेजगे, तात्यासाहेब वाघमोडे, शुभम आनुसे, रोहीत बंडगर, सुरज साळुंखे, गणेश मुळे, महेश लोखंडे आदि युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते .
चौकट-
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी मेटाकुटीला आला आहे.याकडे सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
-सुभाष भोसले (युवासेना, सांगोला तालुका प्रमुख)
0 Comments