राज्यातील सर्वात मोठी बातमी ! झेडपीची निवडणूक आणखी लांबणार?
राज्यातील स्थानिक स्वराज् संस्थांच्या निवडणुकीसंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी आज होणार होती. मात्र, आता ती ४ मे रोजी होणार आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेतले. प्रभाग रचना आणि तेथील आरक्षण ठरविण्याचा अधिकार मिळाल्यावर ओबीसींना आरक्षण देता यावे, असा सरकारचा हेतू होता. मात्र, या निर्णयाला आव्हान देणाऱ्या १३ याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली.
उन्हाळ्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पावसाळ्यात निवडणुका होत नाहीत. त्यामुळे आता थेट पावसाळा संपल्यानंतरच या निवडणुका होऊ शकतील. तो पर्यंत प्रशासक राज कायम राहील. शिवाय ओबीसींच्या आरक्षणाचे काय होणार? हेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


0 Comments