डॉ.अमीर मुलाणी यांना जिवे मारण्याची धमकी
आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांना अज्ञात व्यक्तींकडून जिवे मारण्याची धमकी
सोलापूर प्रतिनिधी : दि.२७ : डॉ.अमीर मुलाणी यांना अज्ञात व्यक्तींकडून जिवे मारण्याची धमकी व चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला आहे ते पुणे येथे अलंकार पोलिस ठाण्यात एका डाॅक्टरच्या कामाविषयी गेल्यानंतर ते काम पुर्ण झाल्यानंतर पुणे हुन सोलापूरकडे येत असताना नरे येथे रात्री 12 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला व एम एच २० सी के २१२२ टाटा सफारी या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला
व जोरदार दगडफेक केली धारधार शास्त्रने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आल्याची तक्रार डॉ.अमीर मुलाणी त्यांनी सिंहगड पोलीसांनकडे तक्रार केली आहे. सिंहगड पोलिसांनी कलम ४२७ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत. डॉ.अमीर मुलाणी यांना सुरक्षा व्यवस्थाची गरज आहे.
ते आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संपुर्ण देशातील डॉक्टरच्या न्याय हक्कासाठी काम करत आहेत व भ्रष्टाचार निर्मूलन व अन्यायाविरुद्ध आवाज ही खुप वेळा उठवला आहे. त्यांना सुरक्षा व्यवस्था मिळावी यासाठी महाराष्ट्रातून सर्व डॉक्टरांकडून प्रशासनाकडे सुरक्षाची मागणी केली जात आहे.


0 Comments