सांगोल्यात सिंघम स्टाईल कारवाई करणारा पोलीस उपायुक्त डॉ . सौरभ त्रिपाठी अखेर निलंबित
गिरगावातील अंगडिया व्यावसायिकांकडे महिना १० लाखांच्या हप्त्याची मागणी करत त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने पोलीस उपायुक्त डॉ.सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले आहे.
त्रिपाठींवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी एक प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे पाठविला होता.गृहविभागाने हा प्रस्ताव पूढे मुख्यमंत्र्यांना पाठविला. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे .परिमंडळ - २ च्या उपायुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर डॉ.त्रिपाठी यांनी अंगाडियांना महीना १० लाखांच्या हफ्ता मागितला.
तो देण्यास नकार देताच अंगडियांना गेल्या डिसेंबरपासून लोकमान्य टिळक मार्ग आणि व्ही . पी . रोड पोलीस ठाण्यात आणण्यास सुरूवात करण्यात आली.
त्यांना आयकर विभागाची भीती दाखवून मग वसुली केली . अंगडीया व्यावसायिकांच्या संघटनेच्या तक्रारीवरुन तपास करत दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
याचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक ( सीआययु ) करत असून पोलीस निरीक्षक ओम वंगाटे , सपोनि नितीन कदम , पोउनि समाधान जमदाडे यांच्या पाठोपाठ त्रिपाठींच्या लखनऊ येथील घरी काम करणारा कर्मचारी पप्पूकुमार गौड याला अटक करण्यात आहे .
या गुन्ह्यात आपले नाव उघड होताच फरार झालेले डॉ . त्रिपाठी यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेश , राजस्थानसह अन्य काही राज्यात रवाना झाली आहेत . त्रिपाठींनी अँड . अनिकेत निकम यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असली तरी त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही . त्रिपाठींची परीमंडळ दोन येथून संरक्षण विभागात बदली झाल्यापासून त्रिपाठी कामावर गैरहजर आहेत .
0 Comments