नॅचरोपॅथी, अल्टरनेटिव मेडिसिन, इलेक्ट्रो होमिओपॅथी, डॉक्टरांना बोगस म्हणाल तर देशभर आंदोलन छेडू ! : डॉ.अमीर मुलाणी
सोलापूर दि.२२ : राज्यात बोगस डॉक्टरांवरील कारवाईच्या नावाखाली आरोग्य विभाग व पोलीस विभागांकडून अल्टरनेटिव मेडिसिन, योगा, नॅचरोपॅथी, कम्युनिटी मेडिकल सर्विस व इसेन्शियल ड्रग्स, इलेक्ट्रो होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, अॅक्युपंचर आदी अधिकृत व नोंदणीकृत डॉक्टरांना त्रास दिला जात आहे
त्यामुळे हा अन्याय दूर करून संबंधितांना बोगसच्या यादीतून वगळावे अन्यथा आयुष भारत देशभर तीव्र आंदोलन छेडणार आहे. असा इशारा आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आमिर मुलानी यांनी दिला आहे.
हे सर्व डॉक्टर मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठातून रीतसर डिग्री डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले आहे यांना माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट व राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मान्यता दिलेल्या आहेत हे सर्व डॉक्टर त्यांच्या पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करू शकतात.
तुम्ही जर कोर्टाने दिलेल्या निकालाचे अवमान करत असाल तर आम्ही संपूर्ण देशात आंदोलन छेडू आम्हाला आमचा अधिकार व न्याय मिळालाच पाहिजे हे चुकीच्या पद्धतीने सुरू आसलेली कारवाई थांबवली पाहिजे नाहीतर आयुष भारत संपूर्ण देशात काळे झेंडे पडकवून तीव्र आंदोलन करणार आहे.
असा इशारा आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिला आहे.
0 Comments