राजेवाडी कॅनॉल मधून उन्हाळी आवर्तनाची पाळी चालू -आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला /प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, शेरेवाडी, अचकदाणी, चिकमहूद, जाधववाडी, लक्ष्मीनगर, नरळेवाडी, महूद बु, वाकी, या गावातील उन्हाळी पिकांना राजेवाडी कॅनॉल मधून पाण्याची पाळी दि १८मार्च पासून चालू केली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थितरित्या मिळणेसाठी उच्च दाबाने पाणी सोडून उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरले नाहीत त्या शेतकऱ्यांनी महुद शाखा कार्यलयात पाणी मागणी अर्ज देण्यात यावेत असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
0 Comments